व्हीएस न्यूज - आईला सोडविण्यासाठी निगडी बस थांब्यावर आलेल्या एका तरूणीशी पावती फाडण्यावरून वाहतूक पोलीस महिलेने वाद घातला. तसेच मधस्थी करणाऱ्या एका पोलीस मित्र महिलेला मारहाण केली. हा प्रकार सोमवारी दुपारी एकच्या सुमारास निगडी पीएमपीएमएल बस थांब्यावर घडला.
मिळालेल्या माहितीनुसार, सोमवारी दुपारी एक तरूणी दुचाकीवरून आपल्या आईला सोडविण्यासाठी बस थांब्यावर आली होती. आईला सोडून ती दुचाकीवर बसली होती. त्याचवेळी निगडी वाहतूक शाखेची टोईंग मोटार तेथे आली. वाहतूक पोलीस कर्मचारी महिलेने तरूणीला पावती फाडावी लागेल, असे सांगितले. तरूणीने मी आईला सोडवून लगेच जाणार होते. मी गाडीवर बसले आहे,तुम्ही पावती फाडू शकत नाही. यावरून पोलीस कर्मचारी महिलेने तरूणीशी वाद घातला. हा वाद पाहून तेथे आलेल्या पोलीस मित्र महिलेने वाहतूक पोलीस कर्मचारी महिलेला तुम्ही चुकीची कारवाई करत आहात, असे सांगितले. यावरून चिडलेल्या पोलीस कर्मचारी महिलेने पोलीस मित्र महिलेने मारहाण केली. पोलीस मित्र महिलेनेही टोईंग मोटारीला आडवी थांबत मोटार जाऊ देणार नसल्याचे सांगितले. त्यामुळे बघ्याची मोठी गर्दी जमली. जमावानेही पोलीस महिलेला चुकीची कारवाई करत असल्याचा जाब विचारला.
निगडी वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक संजय जाधव घटनास्थळी आल्यानंतर हा वाद निवळला. संबंधित तरूणीला वाहतूक पोलीस कर्मचारी महिलेने दमबाजी केल्यामुळे तिने फिर्याद दिली नाही. परंतू, वाहतूक शाखेचे पोलीस कर्मचारी पावती फाडण्यासाठी दादागिरी करत असल्याचा प्रकार समोर आल्याने पोलीसांच्या कामाबाबत उपस्थित नागरिकांनी नाराजी व्यक्त केली.
ADDRESS
VS News, Khararwadi,
Pimpri-Chinchwad
CONTACTS
Email: vsnews24x7@gmail.com
Phone: +91 91724 53002