व्हीएस न्यूज - लोणावळ्यावरुण पुण्याकडे जाणाऱ्या लोकलमधुन बोपोडी रेल्वे पुलाखालील मुळा नदी पात्रात रविवारी रात्री पडलेल्या विवाहीत महिलेचा मृतदेह तब्बल 16 तासांच्या शोधमोहीमेनंतर अग्निशामक दलास सोमवारी दुपारी साडेबाराच्या सुमारास सापडला. शितल सुमित लोहरे (वय-26 रा.पडळ वसाहत आंबेडकर नगर बोपोडी) असे मृत महिलेचे नाव आहे.
पुणे औंध अग्निशामक दलाने शितलचा मृतदेह मुळा नदीपात्रातुन होडीच्या सहाय्याने शोधुन काढला. यावेळी हॅंरीश पुलावर तसेच पुला खालील सब वे मार्गावर बघ्यांची मोठी गर्दी झाली होती. त्यामुळे काहीकाळ वाहतुक कोंडीचा सामना नागरिकांना करावा लागला. रविवारी सायंकाळी शितल या पिंपरी येथे राहत असलेल्या बहिणीकडे तिला भेटण्यास गेली होती. रात्री 8 वाजुन 10 मिनीटांच्या लोकलने त्या पिंपरी रेल्वे स्थानकातुन खडकीकडे निघाल्या होत्या. लोकल बोपोडी रेल्वेपुलावरुण जाताना त्या रेल्वे पुलाखालील मुळा नदी पात्रात पडल्या. लोकल मधील एका महिला रेल्वे प्रवासीने रेल्वे डब्यात सापडलेली बॅंग खडकी रेल्वे पोलिसांना दिली. या बॅंग मधील मोबाईलवर कुटुंबियाचा फोन आला. तेव्हा पोलिसांना सदर बॅंग शितलची असल्याचे समजले.
रेल्वेतील एका प्रवासाने पुणे रेल्वे स्थानक येथे रेल्वे पोलिसांना बोपोडी रेल्वे पुलावरुण एक महिला मुळा नदी पात्रात पडली असल्याची खबर दिली. त्यानंतर रविवारी रात्री अग्निशामक दलाच्या मदतीने खडकी पोलिसांनी प्रथम शोध घेतला. नंतर सोमवारी सकाळी पोलिस उपनिरिक्षिक मदन कांबळे व पोलिस हवालदार मोमिन यांनी अग्निशामक दलाच्या मदतीने पुन्हा शोध मोहिम राबवली. दुपारी12.30 च्या सुमारास अखेर मृतदेह शोध शोधण्याकामी पोलिसांना व अग्निशामक दलास यश आले. उड्डान पुलाच्या कामानिमित्त नदीपात्रात भर टाकल्याने नदीचे पाणी अडुन राहते. त्यामुळे नदीपात्रातील मृतदेह शोधण्यात अडचण आली नाही.
ADDRESS
VS News, Khararwadi,
Pimpri-Chinchwad
CONTACTS
Email: vsnews24x7@gmail.com
Phone: +91 91724 53002