व्हीएस न्यूज - बांधकाम व्यवसायासाठी जमीन खरेदी करण्यासाठी एका बांधकाम व्यावसायिकाकडून चार लाख, 87 हजार रुपये घेतले. खरेदीखत न करता फसवणूक केली.
याप्रकरणी लहानु यशवंत नरोटे (रा. लक्ष्मी तारा अपार्टमेंट, काळेवाडी) यांनी चंद्रशेखर गोकुळ नार्वेकर आणि पवार नावाच्या एका वकीलाविरोधात निगडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, लहानू नरोटे बांधकाम व्यावसायिक आहेत. त्यांना बांधकामासाठी जागा हवी होती. आरोपी नार्वेकर आणि पवार यांनी त्यांना चिखली येथील एका जागेची कागदपत्रे दाखवून नरोटे यांच्याकडून चार लाख, 87 हजार रुपये घेतले. लाखोंची रक्कम घेऊन जमिनीचे खरेदीखत केले नाही. यावरून आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच बांधकाम व्यावसायिक लहानू नरोटे यांनी दोघांविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल केला. पुढील तपास निगडी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक (गुन्हे) शंकर आवताडे करीत आहेत.