समाज मंदिर अंधारात ,पिं.चिं.महानगरपलिका चा जाहीर निषेध, आमरण उपोषणाचा इशारा – संतोष कसबे
पिंपरी
2018-04-03
व्हीएस न्यूज - मोशी येथील संजय गांधी नगर येथे असलेल्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर समाज मंदिर गेल्या दहा वर्ष पासून अंधारात आहे. सदर ठिकाणी पाणी,आरोग्य आणि विद्युत व वृक्ष सुशोभीकरण नसून सदर विषयी महापालिकेला वेळोवेळी कळवण्यात आले होते.
महापालिका प्रशासन या समस्या सोडविण्यास दुर्लक्ष करत असल्याचे आरोप संतोष कसबे ( भोसरी चारोली मंडळ भा.ज.पा. सरचिटणीस ) यांनी केले.
दिनांक- ०२/०४/२०१८ रोजी मा.आयुक्त श्रावण हर्डीकर त्यांना संतोष कसबे यांनी निवेदन दिले आहे . ४८ तासात जर डॉ. बाबासाहेब आंबेडकर समाज मंदिरात आणि परिसरात पाणी ,आरोग्य आणि विद्युत या वृक्ष सुशोभीकरण झाले नाही तर आमरण उपोषण करण्याचा इशारा संतोष कसबे यांनी निवेदना द्वारे दिला आहे.