व्हीएस न्यूज - माजी कर्नल महिलेच्या आईच्या बॅक खात्यावरून एका नामांकित बॅकेतील कर्मचाऱ्याने सव्वासात लाख रुपये काढून फसवणूक केली. हा प्रकार जानेवारी ते 6 मार्च 2018 दरम्यान पिंपरीत घडला. माजी कर्नल तृप्ता किशन सूरी (वय 59, रा. डॉ. डी. वाय. पाटील मेडिकल कॉलेज स्टाफ क्वार्टर, पिंपरी) यांनी पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पृथ्वीराज सावळे (वय-26) याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत फौजदार मधुसूदन घुगे यांनी माहिती दिली. तृप्ता सुरी या माजी कर्नल आहेत. त्या पिंपरीतील डी. वाय. पाटील मेडिकल महाविद्यालयात संचालक मंडळावर कार्यरत आहेत. जानेवारीमध्ये एका नामांकित बॅकेचे काही कर्मचारी कर्मचाऱ्यांची सॅलरी बॅक खाते काढण्यासाठी महाविद्यालयात आले होते. यावेळी फिर्यादी यांनी आरोपी पृथ्वीराजला आपल्या ज्येष्ठ आईचेही बॅकेत खाते काढण्याचे असल्याचे सांगितले. खाते काढल्यानंतर 51 हजार रूपयांचा धनादेश जमा केला. त्यानंतर साडेतेरा लाख रूपयांचा धनादेशही जमा करण्यास आरोपीला सांगितले. त्यानंतर आरोपीने धनादेशाचे पैसे खात्यावर जमा झाल्यानंतर खात्यातून सात लाख 25 हजार 709 रुपये काढून घेतले. हा प्रकार सूरी यांच्या लक्षात येताच त्यांनी पोलीस ठाण्यात धाव घेत फिर्याद दिली.
पिंपरी पोलीस अधिक तपास करीत आहेत.
ADDRESS
VS News, Khararwadi,
Pimpri-Chinchwad
CONTACTS
Email: vsnews24x7@gmail.com
Phone: +91 91724 53002