व्हीएसन्यूज - जुन्या भांडणाचा राग मनात धरून चौघांनी तरुणावर लोखंडी कोयता आणि तलवारीने वार केले. यामध्ये तरुण गंभीर जखमी झाला. ही घटना रविवारी रात्री तळवडे येथे घडली. नितीन महावीर चंदनशिवे (वय-20, रा. सिध्दनाथ हाऊसिंग सोसायटी, रुपीनगर तळवडे) याने निगडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. रोहित सकट, हृतिक सकट, बबलू (तिघेही रा. दळवीनगर, निगडी), आक्या बॉण्ड (रा. घरकुल, चिखली) अशी गुन्हा दाखल झालेल्या आरोपींची नावे आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी नितीन चंदनशिवे रविवारी रात्री जेवण करून बाहेर फिरण्यासाठी गेला होता. आरोपी एका पानटपरीवर उभे होते. नितीनची आरोपींबरोबर दीड महिन्यापूर्वी भांडण झाले होते. या भांडणाचा राग मनात धरून आरोपींनी लोखंडी कोयता आणि तलवारीने नितीनवर वार केले. यामध्ये तो गंभीर जखमी झाला. भांडणे सोडविण्यासाठी नितीन याचा भाऊ प्रवीण आला असता त्यालाही आरोपींनी मारहाण केली. नितीनवर खासगी रूग्णालयात उपचार सुरू आहेत. फौजदार एस. वाय. होळकर अधिक तपास करत आहेत.