व्हीएस न्युज - लोखंडी कोयते आणि तलवारीचा धाक दाखवून सात जणांच्या टोळक्याने चिखली, म्हेत्रेवस्ती येथे दोन ठिकाणी लुटमार केली. ही घटना सोमवारी मध्यरात्री दोनच्या सुमारास घडली. भागीराम चौधरी (वय 21, रा. म्हेत्रेवस्ती, चिखली, पुणे) यांनी निगडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. आक्या बॉण्ड (रा. घरकुल, चिखली), वसीम शेख (रा. ओटा स्कीम, निगडी), विशाल खरात (रा. ओटा स्कीम, निगडी), अजय चौधरी, राहुल दांडे आणि अन्य दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी भागीराम चौधरी म्हेत्रेवस्ती मधील सिद्दीविनायक सोसायटीमध्ये राहतात. सोमवारी रात्री दोनच्या सुमारास सात जणांच्या टोळक्याने त्यांच्या सोसायटीमध्ये घुसून लोखंडी कोयते व तलवारीचा धाक दाखवून फिर्यादी भागीराम चौधरी यांचा एक मोबाईल, आर्या चौधरी यांचे पाकीट व रोख रक्कम, कन्हैया चौधरी यांच्याकडील रोख रक्कम असा एकूण सात हजार 50 रुपयांचा ऐवज चोरून नेला. तसेच आकाश भीम थापा, मौसम चौधरी या दोघांना मारहाण केली. यामध्ये दोघे जखमी झाले आहेत. यानंतर याच टोळक्याने कुदळवाडी येथील कृष्णा इंजिनिअरिंग कंपनीमध्ये घुसून कंपनीतील कामगार सुबेंदू पात्रा आणि गौरीशंक गुरुलिंगय्या स्वामी यांना मारहाण केली. कंपनीतील कामगार हरिलाल रामूजागीर यांचा मोबाईल फोन चोरून नेला. सहाय्यक पोलीस निरीक्षक योगेश आव्हाड अधिक तपास करीत आहेत.
ADDRESS
VS News, Khararwadi,
Pimpri-Chinchwad
CONTACTS
Email: vsnews24x7@gmail.com
Phone: +91 91724 53002