व्हीएसन्युज - बसमधून उतरून मोबाईलवर बोलत पायी जाणाऱ्या एका तरूणाचा दुचाकीवरून आलेल्या चोरट्यानी आठ हजार रूपये किंमतीचा मोबाईल हिसकावला. ही घटना रविवारी दुपारी तीन वाजता शाहुनगर नंदिनी हॉटेल चौकात घडली. शंतनू ठुबे (वय-23, रा. पुर्णानगर, चिंचवड) याने भोसरी, एमआयडीसी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. शंतनू रविवारी दुपारी बसमधून उतरून मोबाईलवर बोलत पायी जात होता. नंदिनी हॉटेल चौकात दुचाकीवरून आलेल्या तीन चोरट्यांपैकी एकाने शंतनूच्या हातातील मोबाईल जबरदस्तीने हिसकावून नेला. फौजदार बांबळे अधिक तपास करत आहेत.