हिंजवडीत मोबाईल शॉपी फोडली, पावणे दोन लाखांचा ऐवज लंपास
हिंजवडी
2018-04-04
व्हीएसन्युज - कुलूप लावून बंद असलेल्या मोबाईल शॉपीच्या पत्रा उचकटून चोरट्यांनी आत प्रवेश केला. दुकानातील विविध कंपन्याचे मोबाईलसह रोख रक्कम असा 1 लाख 86 हजारांचा ऐवज चोरून नेला. ही घटना 31 मार्च मध्यरात्री हिंजवडीतील शिवाजी चौकात घडली. प्रविण जगताप (वय-36, रा. पवार नगर, थेरगांव) यांनी हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, पवार यांची हिंजवडीतील शिवाजी चौकात न्यु टेक मोबाईल शॉपी आहे. 31 मार्च मध्यरात्री चोरट्यांनी शॉपीच्या पाठीमागील पत्रा उचकटून दुकानात प्रवेश केला. विविध कंपन्यांचे 13 मोबाईल व 19 हजारांची रोकड असा 1 लाख 86 हजार 143 रूपयांचा ऐवज चोरून नेला. फौजदार न्यायणे अधिक तपास करत आहेत.