कॅमल चित्रकला स्पर्धेत चोपडा महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांचे यश
पिंपरी
2018-04-06
व्हीएस न्यूज - पाच जिल्ह्यामध्ये आयोजित केलेल्या कॅमल चित्रकला स्पर्धेत चिंचवड येथील श्रीमती गेंदीबाई ताराचंद चोपडा महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी यश संपादन केले.फ गटामध्ये नयन भालेराव याने द्वितीय पटकाविला. त्याच्या चित्राची राज्यस्तरावर निवड झाली आहे. याबद्दल संस्थेचे ऍड. राजेंद्र मुथा, अनिल कांकरिया, प्रकाश चोपडा, प्राचार्य के.सी. अनेचा यांनी नयनचे अभिनंदन केले. नयनला चित्रकला शिक्षक जी. डी. हरिदास यांनी मार्गदर्शन केले.