सीएसआर अंतर्गत चऱ्होलीतील मनपा शाळेला ई-लर्निंग साहित्य
पिंपरी
2018-04-06
व्हीएस न्यूज - चऱ्होली येथील महापालिकेच्या शाळेसाठी सी.एस.आर.च्या माध्यमातून खाजगी कंपन्याचे सहकार्य या उद्देशांतर्गत पंडित जवाहरलाल नेहरु प्राथमिक शाळा, चऱ्होली येथे महापौर नितीन काळजे यांच्या हस्ते शाळेतील विद्यार्थ्यांना ई-लर्निंग साहित्य तसेच खेळाच्या साहित्यांचे गुरूवारी वाटप करण्यात आले.
याबरोबरच जानकीदेवी बजाज एज्युकेशनल इनिसिएटिव्ह या संस्थेच्या वतीने कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिब्लिटी (सी.एस.आर.) च्या माध्यमातून शाळेतील विद्यार्थ्यांना एल.ई.डी.टी.व्ही., ई. लर्निंग साहित्य, क्रीडा साहित्याचे वाटपही महापौर काळजे यांच्या हस्ते झाले. यावेळी नगरसेविका सुवर्णा बुर्डे, महिला बालकल्याण समितीच्या सभापती सुनिता तापकीर, शाळेचे मुख्याध्यापक नामदेव उथळे, जानकीदेवी बजाज संस्थेचे के. बी. वाळके, हेमांगी ठोनावाला, शाळा समन्वय समिती अध्यक्ष पांडूरंग पठारे, उपाध्यक्ष सुनिल तापकीर इत्यादी मान्यवर उपस्थित होते.