व्हीएस न्यूज - वाल्हेकरवाडीचिंचवड येथे बेकायदेशीरपणे सिलेंडर विक्री करणाऱ्या दुकानावर अन्न पुरवठा विभागाने बुधवारी छापा टाकून कारवाई केली. या कारवाईत मोठ्या प्रमाणात सिलेंडरचा साठा आढळून आला असून अन्न पुरवठा विभागाने चौकशीसाठी तिघांना ताब्यात घेतले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, वाल्हेकरवाडी परिसरात पवना नदीच्या किनारी एक पत्र्याचे शेड तयार केले आहे. त्यामध्ये नामांकित कंपनीच्या मोठ्या गॅस सिलेंडरमधून लहान गॅस सिलेंडरमध्ये गॅस भरलाकेला जात होता. याबाबत अन्न पुरवठा विभागाला माहिती मिळताच विभागाच्या सहा अधिकाऱ्यांनी बुधवारी या दुकानावर छापा मारला. यावेळी दुकानात सुमारे 250 गॅस सिलेंडर आढळून आले. त्यापैकी दोन सिलेंडर लिकेज सापडले. लिकेज असलेले सिलेंडर अग्निशमन विभागाचे विकास नाईक, विशाल बाणेकर, विठ्ठल तपकाळ आणि संजय महाडिक यांनी तात्काळ दुरुस्त केले.झोपडपट्टीतील मुलांच्या मार्फत ही बेकायदा सिलेंडर विक्री केली जाते. आरोपी नामांकित गॅस कंपन्यांच्या गॅस सिलेंडर मधून गॅस काढून लहान गॅसमध्ये भरून त्याची विक्री करीत होते. छापा मारल्या वेळी बेकायदा सिलेंडरचा मोठा साठा पकडण्यात आला आहे. अन्न पुरवठा विभागाने चौकशीसाठी तिघांना ताब्यात घेतले आहे.