व्हिएस न्यूज - निकृष्ठ दर्जाचे खाद्यपदार्थ, प्रचंड घाणिचे साम्राज्य अशा इतर अनेक कारणास्तव खडकी येथिल सागर बेकरीस खडकी कॅंन्टोन्मेंट बोर्डाच्या वतिने बुधवारी नोटीस बजावण्यात आली.
वैद्यकीय अधिकारी कर्नल कुशवाह व कॅंन्टोन्मेंट बोर्डाचे आरोग्य निरिक्षक कलावंत पवार, मुकादम नासिर व त्यांच्या पथकाने बुधवारी महात्मा गांधी रोड येथिल सागर बेकरीची पुनश्च पाहणी केली असता बेकरीमध्ये मोठ्या प्रमाणात चिखल व घाणीचे साम्राज्य आढळुण आले. या व्यतिरीक्त उंदीर घुशींचा वावर ही निदर्शनास आला. कामगार ही अस्वच्छ स्वरुपात कामे करताना आढळुण आले. बेकरीतील माल व वस्तुंवर माल बनविलेली तारीखेचा उल्लेख ही निदर्शनास आले नाही. अशा प्रकारे बेकरी मालकाकडुन आवश्यक त्यासर्व नियमांकडे जाणुन बुजुन दुर्लक्ष केले जात असल्याने कॅंन्टोन्मेंटच्या वतिने बेकरीचे मालक अब्दुल सलाम अन्सारी यांना अंतिम नोटीस बजावण्यात आली.
यावेळी निकृष्ठ दर्ज्याच्या खाद्य पदार्थांची विल्हेवाट लावण्यात आली. सात दिवसात बेकरीत आढळुण आलेल्या अस्वच्छता घाण तसेच इतर त्रुटीबाबत कायदे व नियमांचे पालन न केल्यास बोर्ड प्रशासनाच्या कठोर कारवाई केली जाईल, असा इशारा बोर्ड प्रशासनाने या नोटीसी अंतर्गत बेकरी मालक अन्सारी यांना देण्यात आला आहे. बेकरी मालक अन्सारी यांना यापुर्वी ऑक्टोबर 2016 व दि. 28 नोव्हेंबर 2017 रोजी याप्रकरणी दोनदा नोटीस बजावण्यात आली होती.
ADDRESS
VS News, Khararwadi,
Pimpri-Chinchwad
CONTACTS
Email: vsnews24x7@gmail.com
Phone: +91 91724 53002