राष्ट्रवादी सामाजिक विभागाच्या गंगा धेंडे यांचे पद रद्द
पिंपरी-चिंचवड
2018-06-25
व्हीएस न्यूज- राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या महिला प्रदेशाध्यक्ष चित्रा वाघ यांनी प्रत्येक जिल्ह्यात एकच महिला अध्यक्ष असे धोरण राबविण्यास सुरूवात केली आहे.
या धोरणानुसार पिंपरी-चिंचवड राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या सामाजिक न्याय विभाग महिला अध्यक्षा गंगा धेंडे यांचे पद रद्द करण्यात आल्याची माहिती सामाजिक विभागाचे प्रदेशाध्यक्ष व आमदार ऍड. जयदेव गायकवाड यांनी दिली आहे. याबाबत धेंडे यांना गायकवाड यांनी 18 जून रोजी पत्र दिले आहे.