- आळंदी नगरपरिषदेचे भाजपचे स्व. नगरसेवक बालाजी कांबळे कुटुंबियांचे पालक मंत्री
गिरीश बापट, भाजपचे प्रदेश अध्यक्ष रावसाहेब दानवे, आमदार सुरेश गोरे यांनी कांबळे कुटुंबियांचे सांत्वन
करीत सर्व प्रकारची मदत आणि सहकार्य करण्याची ग्वाही दिली.
नगरसेवक कांबळे यांचे कुटुंबियांचे संरक्षण व मदतीची ग्वाही देत पालकमंत्री गिरीश बापट यांनी
कांबळे यांचे कुटुंबियांचे शोकाकुल वातावरणात सांत्वन केले. यावेळी नगरसेवक कांबळे यांचे सात वर्षीय
मुलीने तसेच परिवाराने दुखांकित वातावरणात पालकमंत्री बापट यांना आपल्या मनातील भावना व
यापूर्वीचे घटना व्यक्त करीत न्यायासाठी दाद मागितली.
यावेळी पोलीस उपायुक्त गणेश गावडे, नगराध्यक्षा वैजयंता उमरगेकर, उपनगराध्यक्ष सागर भोसले,
नगरसेविका स्मिता रायकर, सुनीता रंधवे, भाजपच्या महिला शहराध्यक्षा शैलजा मोळक, माजी नगरसेवक
अशोक उमरगेकर, खेड भाजपचे अध्यक्ष अतुल देशमुख उपस्थित होते.
याप्रसंगी नगरसेवक सचिन गिलबिले यांनी पालकमंत्री बापट यांना कांबळे कुटुंबियांना आर्थिक मदत
शासनाने व भाजपने देण्याची मागणीचे निवेदन दिले. देहू फाटा चौकात पोलीस चौकीची मागणी करीत
निवेदन देण्यात आले.
ADDRESS
VS News, Khararwadi,
Pimpri-Chinchwad
CONTACTS
Email: vsnews24x7@gmail.com
Phone: +91 91724 53002