व्हीएस न्यूज - डंपरची दुचाकीला धडक बसल्याने एका महाविद्यालयीन तरुणाचा जागीच मृत्यू झाला. ही घटना आकुर्डी येथील म्हाळसाकांत विद्यालयाजवळ गुरुवारी(दि.2) सकाळी नऊच्या सुमारास घडली. आशिष दीपक पावसकर (वय, 19 रा. शुभश्री सोसायटी, आकुर्डी) असे या अपघातात मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव आहे. या अपघातामध्ये त्याचा मित्र रोशनदीप दिलीपकुमार मेकाप हा जखमी झाला असून, त्याच्यावर उपचार सुरू आहेत. याप्रकरणी ट्रकचालक शिवकुमार हरिराम डांगे (वय 48, अशोकनगर, मध्यप्रदेश) याला पोलिसांनी अटक केली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, आशिष हा ताथवडे येथील एका खासगी अभियांत्रिकी महाविद्यालयात शिकत होता. गुरुवारी (दि.2)सकाळी आशिष व त्याचा मित्र रोशनदीप दुचाकीवरुन खंडोबा चौकातून म्हाळसाकांत चौकात जात होता. यावेळी त्याच्या दुचाकीला ट्रकची धडक बसली. यात आशिषच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. यामुळे तो जागीच मरण पावला. या अपघातात रोशनदीप गंभीर जखमी झाला आहे.
आशिषचे वडील मुंबईतील एका बहुराष्ट्रीय कंपनीत अभियंता म्हणून काम करतात, तर आई चिंचवडमधील एका खासगी महाविद्यालयात शिक्षिका असून, तो आईसोबत आकुर्डीत राहत होता. निगडी पोलीस अधिक तपास करत आहेत.
ADDRESS
VS News, Khararwadi,
Pimpri-Chinchwad
CONTACTS
Email: vsnews24x7@gmail.com
Phone: +91 91724 53002