भारत बंद ; मनसे कार्यकर्त्यांचा पिंपरीत ग्रेडसेपरेटरमध्ये ठिय्या
पिंपरी
2018-09-10
व्हीएस न्युज - पेट्रोल, डिझेल व एलपीजी गॅसच्या दरांमध्ये सातत्याने वाढ होत असल्याच्या निषेधार्थ काँग्रेस पक्षाने आज (सोमवारी)भारत बंद पुकारला आहे. या बंदला महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने सुद्धा पाठिंबा दिला असून राज्यभरात मनसेने आंदोलनात सक्रिय सहभाग घेतला आहे.
पिंपरीत देखील मनसे पेट्रोल-डिझेल दरवाढीविरोधात आक्रमक झाली आहे. मनसेचे शहराध्यक्ष सचिन चिखले यांच्या नेतृत्वाखाली पिंपरी महापालिका भवनासमोर पुणे-मुंबई द्रुतगती महामार्ग रोखून धरला. ग्रेडसेपरेटरमध्ये कार्यकत्यांनी ठिय्या मांडला आहे
. पुण्यावरुन निगडीकडे जाणारी वाहने मनसेने रोखून धरली आहेत.