व्हीएस न्युज - प्रियकराने प्रेयसिला लग्नाचे आमिष दाखवून दुसऱ्या तरुणीसोबत विवाह जमवल्याने प्रेयसिने इमारतीवरुन उडी घेत आत्महत्या केली. याप्रकरणी प्रियकरावर गुन्हा दाखल केला आहे.
ईश्वरी बाबूराव पोकळे (वय २२, रा. नयन गोविंद गार्डन, पिंपळे गुरव) असे आत्महत्या केलेल्या तरुणीचे नाव आहे. याप्रकरणी सांगवी पोलीस ठाण्यात पुष्पा बाबूराव पोकळे (वय ५०, रा. पैठण, औरंगाबाद) यांनी फिर्याद दिली आहे. त्यानुसार, योगेश गोकूळ सोनावणे (रा. प्रिय अपार्टमेंट, सिडको, रामनगर, औरंगाबाद) या तरुणाविरोधात आत्महत्या करण्यास प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी प्रियकर योगेश याने जुलै २०१८ ते १४ नोव्हेंबर २०१८ या कालावधीत ईश्वरी हिला लग्नाचे आमिष दाखविले. एवढेच नव्हे तर ते दोघेजण पिंपळे गुरव येथे एकाच रुममध्ये राहत होते. मात्र योगेश याने दुसऱ्या मुलीसोबत विवाह ठरवला. याबाबत त्याने ईश्वराला सांगितले. यावर ईश्वरी निराश झाली तिने इमारतीवरून उडी घेत आत्महत्या केली.
याप्रकरणी योगेश सोनावणे विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सहायक निरीक्षक अलका सरग अधिक तपास करत आहेत.
ADDRESS
VS News, Khararwadi,
Pimpri-Chinchwad
CONTACTS
Email: vsnews24x7@gmail.com
Phone: +91 91724 53002