व्हिएसन्युज - नेहरुनगर संतोषी माता चौकाजवळील टेल्को रोडवर सोमवारी दुपारी साडेबाराच्या सुमारास रस्त्याच्या कडेला उभी असलेल्या एका इंडिका कारला अचानक आग लागली. या आगीत इंडिका कार जळून खाक झाली.
घटनेची माहिती मिळताच संत तुकारामनगर येथील अग्निशमन दलाचा एक बंब घटनास्थळी दाखल झाला आणि १५ ते २० मिनिटातच आग विझवण्यात यश आले. मात्री आगीमुळे कारचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. आगीचे कारण अद्याप समजू शकले नाही. कोणत्याही प्रकारची जिवीत हाणी झालेली नाही.