पोलीस उप अधीक्षक श्रीकांत मोहिते यांची पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयात सहायक आयुक्त म्हणून नियुक्ती
पिंपरी चिंचवड
2019-01-05
व्हीएसन्युज – ठाणे येथील राज्य महामार्ग पोलीस उप अधीक्षक म्हणून कार्यरत असलेले श्रीकांत मोहिते यांची पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयात सहायक आयुक्त म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. याबाबतचा आदेश गुरुवार गृह विभागाने प्रसिध्द केला.
गृह विभागाने एकूण १८ बड्या पोलीस अधिकाऱ्यांच्या राज्यातील विविध ठिकाणी बदल्या केल्या आहेत. यामध्ये अपर पोलीस अधिक्षक, उप अधिक्षक, सहायक पोलीस आयुक्त, विभागीय पोलीस अधिकाऱ्यांचा समावेश आहे.
पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयात सहायक आयुक्त म्हणून नियुक्त करण्यात आलेले श्रीकांत मोहिते यांनी पूर्वी ठाणे येथे राज्य महामार्ग उप अधिक्षक म्हणून काम पाहिले आहे. यामुळे त्यांचा वाहतूक नियोजनात तगडा अनुभव असल्याचे बोलले जात आहे.