पिंपरी : मातोश्री ग्रूप आणि शहरातील शिवसैनिकांनी केली मातोश्री वर गुरुपौर्णिमा साजरी
पिंपरी
2019-07-17
व्हीएसन्युज - गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने मातोश्री निवासस्थानी जाऊन पिंपरी येथील मातोश्री ग्रूप आणि पिंपरी चिंचवड शहरातील शिवसैनिक दरवर्षी प्रमाणे यावर्षी सुद्धा हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांना वंदन केले.
या दरम्यान पक्षप्रमुख उध्दव ठाकरे आणि शिवसेना परिवहन मंत्री दिवाकर रावते यांची भेट घेऊन तुळशीहार,शाल आणि पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला आणि संभाजी महाराजांची प्रतिमा देऊन गुरुपौर्णिमेच्या शुभेच्छा देण्यात आल्या.
या वेळी शिवसेना भंडारा गोदिंया जिल्हा संपर्कप्रमूख निलेश धूमाळ, मातोश्री ग्रूप संस्थापक अध्यक्ष गणेश आहेर, शिवसेना विभागप्रमूख गोरख पाटील निलंगेकर, विभागप्रमूख प्रदिप दळवी,विभागसंघटक अंकुश कोळेकर, बाळासाहेब गायकवाड,जितू कुलकर्णी,मारुती म्हस्के, दत्ता गिरी,सर्व शिवसेना पदाधिकारी उपस्थित होते.