व्हीएस न्यूज – दुचाकीवरुन ट्रीपल सीट जाणाऱ्या तीन तरुणांना भरधाव वेगात जाणाऱ्या कारची धडक बसली. यामध्ये दोन तरुणांचा गंभीर जखमी होऊन जागीच मृत्यू झाला. ही घटना शनिवारी (दि.4) मोशी येथे रात्री साडेबारा वाजता घडली.
योगेश मारुती कडवे (वय 27 रा. जाधववाडी, चिखली) आणि गोविंद देवराव शेळके (वय 22 रा. जाधववाडी, चिखली) असे मयत तरुणांची नावे आहेत. तर संतोष अरुण डिडवळ (वय 23 रा. आदर्शनगर, मोशी) हा गंभीर जखमी झाला आहे. याप्रकरणी आदिनाथलेंडगुळे (वय 22 रा. जाधववाडी) यांनी फिर्याद दिली आहे. योगेश, गोविंद व संतोष हे तिघे दुचाकीवरुन ट्रीपलसीट चुकीच्या दिशेने जात असताना समोरुन येणाऱ्या अज्ञात कारची दुचाकीला जोरदार धडक बसली. यामध्ये योगेश आणि गोविंदचा जागीच मृत्यू झाला. तर संतोषडिडवळ हा गंभीर जखमी झाला.