व्हीएस न्यूज – नातेवाईकाला मारल्याच्या मोबदल्यात बीअरचा बॉक्स न दिल्याच्या रागातून चार जणांच्या टोळक्याने एका तरुणावर कोयत्याने वार केले. ही घटना शनिवारी (दि.4) सायंकाळी साडे चार वाजता रहाटणी येथील विक्रांत वाईन शॉपी जवळ घडली.
याप्रकरणी दादा शिंगे, अनिकेत पाटील, महेश बीराजदार व त्यांचा एक साथीदार यांच्यावर वाकड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी जखमी शिवकुमार पलकोंडे (वय 30 रा. रहाटणी) यांनी फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शिवकुमारला त्याच्या गाडीची काच नातेवाईकाने फोडल्याचा संशय होता. या घटनेचा राग मनात धरुन त्याने त्याचे आरोपी मित्रांजवळ नातेवाईकांचा बदला घेण्याचे बोलून दाखवले. आरोपींनी संबंधीत नातेवाईकास मारहाण करुन त्याबदल्यात शिवकुमार याच्याकडे बीअरच्या बॉक्सची मागणी केली. मात्र शिवकुमारने बीअरचा बॉक्स न दिल्याने चिडून आरोपींनी, बॉक्स का देत नाहीस अशी विचारणा करत त्याच्यावर कोयत्याने वार केले. आरोपींनी शिवकुमार याच्या डाव्या खांद्यावर व डाव्या हातावर वार केलेतसेच भांडण सोडवणारे शिवकुमार यांचा मेहुणे तनिल गजलवाड यांनाही आरोपींनी जिवे मारण्याची धमकी दिली. या प्रकरणी वाकड पोलीस ठाण्यात चौघांविरोधात गुन्हा दाखल केला असून पोलीस तपास करत आहेत.
ADDRESS
VS News, Khararwadi,
Pimpri-Chinchwad
CONTACTS
Email: vsnews24x7@gmail.com
Phone: +91 91724 53002