व्हीएस न्यूज – भरधाव कारच्या धडकेत पादचारी महिलेचा मृत्यु झाला. ही घटना आळंदी-मोशी रस्त्यावरील डुडळगाव येथे बुधवारी (दि. 1) सकाळी पावणे नऊच्या सुमारास घडली.
सत्यभामा हनुमंत मुरकुट (वय 79, रा. डुडुळगाव ) असे मृत पादचारी महिलेचे नाव आहे. याप्रकरणी कारचालक संजीव नंदकिशोर शर्मा (वय 44, रा. चंदननगर, वडगाव शेरी) याच्यावर दिघी ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सत्यभामा या आळंदी-मोशी रस्त्याने पायी जात होत्या. यावेळी संजीव शर्मा याने वाहतुकीच्या नियमांकडे दुर्लक्ष करुन, हयगयीने कार चालविल्याने सत्यभामा यांना कारची धडक बसली. या अपघातात गंभीर जखमी झालेल्या सत्यभामा यांचा मृत्यू झाला. दिघी ठाण्याचेपोलीस उपनिरीक्षक घिगे तपास करत आहेत.