व्हिएसन्युज - सोशल मीडियावर महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या विरोधात अश्लील कमेंट करणाऱ्या व्यक्ती विरोधात आळंदी पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक रवींद्र चौधर यांनी दिली. याबाबत माजी नगरसेवक डी. डी. भोसले पाटील यांनी फिर्याद दिली आहे.
त्यांच्या फिर्यादीवरून नवनीतकुमार देशमुख या व्यक्तीविरोधात मुख्यमंत्र्यांची बदनामी व शिवीगाळ केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. देशमुख हा मूळ जिंतूर, जि. परभणी येथील रहिवासी असून आळंदीत खासगी वारकरी प्रशिक्षण संस्था चालवतो.