व्हिएस न्युज - कोरोना विषाणूच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे देशात घोषित करण्यात आलेला लॉकडाऊन 17 मे पर्यंत वाढवण्यात आला आहे. मात्र या काळातही राज्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये दारु विक्रीला सशर्त परवानगी मिळाली आहे. रेड, ग्रीन आणि ऑरेंज अशा तिन्ही झोनमध्ये दारूची दुकाने उघडली जातील, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे प्रधान सचिव भूषण गगरानी यांनी सांगितले व त्या प्रमाणे दारूची दुकाने उघडली सुद्धा ,पण तळीरामांची दारूच्या दुकानाच्या बाहेरील झुंबड बगता आणि कोरोना विषाणूच्या वाढत्या प्रादुर्भावा लक्षात घेता दारू विक्रीला परवानगी देणे हा निर्णय धोकेदायक ठरत असल्याचे दिसत आहे. पिंपरी चिंचवड शहरात तर सोशल डिस्टंस्टिंगचा आणि कोरोना प्रतिबंध उपाययोजनांचा फज्जा उडाला आहे म्हणून पिंपरी चिंचवड महानगपालिकेचे प्रभाग क्रमांक ९ चे नगरसेवक समीर मसुळकर यांनी लॉक डाऊन संपुष्टात आल्यावरच दारू विक्रीला परवानगी द्या अशी मागणी पुण्याचे पालकमंत्री व महाराष्ट्राचे उप मुख्यमंत्री अजित पवार यांना केली आहे.
इतर राज्यांच्या तुलनेत महारष्ट्रातील रुग्णांची संख्या मोठी आहे. अशा परिस्थितीत राज्य सरकारने आर्थिक कारण पुढे करून राज्यभरात दारू विक्रीला परवानगी देण्याचा आत्मघातकी निर्णय घेतला आहे. निदान दारू विक्री मुळेतरी कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव राज्यात वाढू नये असे मत नगरसेवक समीर मासुळकर यांनी व्यक्त केले.
ADDRESS
VS News, Khararwadi,
Pimpri-Chinchwad
CONTACTS
Email: vsnews24x7@gmail.com
Phone: +91 91724 53002