व्हीएस न्यूज – ट्रकच्या धडकेत एका महिलेचा मृत्यू झाला; तर तिचा पाच वर्षांचा मुलगा किरकोळ जखमी झाला आहे. ही घटना मंगळवारी (दि. 6) रात्री साडे आठ वाजता पिंपळे गुरव येथे घडली.
याप्रकरणी ट्रक ड्रायव्हर निलेश पंडित पठारे (वय 24, रा. खांडवी, अहमदनगर) याला पोलिसांनी अटक केली आहे. प्रज्ञा विक्रांत वाघमारे (वय 30, रा. सुदर्शननगर, पिंपळे गुरव), असे मृत्यू झालेल्या महिलेचे नाव असून त्यांचा मुलगा विहान विक्रांत वाघमारे (वय 5) हा किरकोळ जखमी झाला आहे. या प्रकरणी मयत वाघमारे यांचे भाऊ पंकज विलास कांबळे (वय 40, रा. मरकळ रोड, आळंदी) यांनी सांगवी पोलीस ठाण्यात फर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कांबळे हे त्यांची बहीण प्रज्ञा व भाचा विहान यांना दुचाकीवरून प्रज्ञा यांच्या घरी सोडण्यास जात होते. यावेळी (एमएच 42, टी 1402) या ट्रकने पिंपळे गुरव येथील लक्ष्मीनगरमध्ये त्यांच्या दुचाकीला पाठीमागून धडक दिली. या अपघातात ट्रकचे चाक प्रज्ञा यांच्या अंगावरून गेले. यामध्ये त्या गंभीर जखमी झाल्या. त्यांना तातडीने रुग्णालयात नेण्यात आले. मात्र, त्यांचा उपचारापुर्वीच मृत्यू झाला. तर विहान व कांबळे हे किरकोळ जखमी झाले. सांगवी पोलिसांनी ट्रकसह आरोपीला ताब्यात घेतले असून, याचा पुढील तपास करत आहेत.
ADDRESS
VS News, Khararwadi,
Pimpri-Chinchwad
CONTACTS
Email: vsnews24x7@gmail.com
Phone: +91 91724 53002