व्ही एस न्युज- निगडीत उभारण्यात आलेल्या अॅटोमॅटिक टॉयलेटची भुरळ शहराला पडली असून आता यानंतर शहरभरात खाजगी कंपन्यांच्या मदतीने आणखी चार अॅटोमॅटिक टॉयलेट उभारण्याचा महापालिकेचा मानस असल्याची माहिती स्वच्छ भारत कक्षाचे प्रमुख सहआयुक्त दिलीप गावडे यांनी दिली. सॅमटेक क्लिन अँड केअर या खासगी कंपनी व महापालिकेच्या वतीने निगडी बसस्टॉपजवळ शहरातील पहिले अॅटोमॅटिक टॉयलेट उभारण्यात आले आहे. त्याच धर्तीवर शहरात इतर चार ठिकाणी अशा प्रकारचे टॉयलेट उभारण्यात येणार आहे. अटोमॅटीक टॉयलेट संपूर्णत: स्टेनलेस स्टीलचे असून त्यामध्ये वॉश बेसिन, ऍल्युमिनियम फ्लोरींग, ऑटो क्लींनिंग आणि टॉयलेट सिट, इनबिल्ट वॉटर टँक, सेन्सर फॉर इलेक्ट्रीसिटी कन्झरवेशन, जीपीआरएस लोकेशन, हेल्थ मॉनिटरींग, महिलांकरिता सॅनिटरी नॅपकीन मशीन इत्यादी सुविधा असणार आहेत. पाच रुपयांचा कॉईन टाकल्यानंतरच त्याचा वापर नागरिकांना करता येणार आहे. रहाटणी बसस्टॉप, पिंपळे सौदागर, चिंचवडमधील एम्पायर इस्टेटजवळ आणि नाशिकफाटा या चार ठिकाणी सॅमटेक क्लिन अँड केअर या खासगी कंपनीच्या वतीने अॅटोमॅटिक टॉयलेट उभारण्यात येणार आहेत. शहरातील अन्य कंपन्यांच्या मदतीने इतर भागातही ही सुविधा सुरु करण्याचा प्रयत्न महापालिकेकडून करण्यात येणार आहे. याचा खर्च संबंधित कंपनीकडून जाहिरात व कॉईन कलेक्शनच्या माध्यमातून भागविला जाणार असल्याचेही गावडे यांनी सांगितले.
ADDRESS
VS News, Khararwadi,
Pimpri-Chinchwad
CONTACTS
Email: vsnews24x7@gmail.com
Phone: +91 91724 53002