व्हीएस न्यूज - त्वरित चाचणी करुन रोग निदान करण्याच्या हेतूने ठाणे येथील भारतीय बनावटीचे वैद्यकिय चाचणी उपकरणे निर्मीत करणाऱ्या बायोसेन्स टेक्नोलॉजी कंपनीने विकसीत केलेले मशिन महापालिकेच्या रुग्णालय व दवाखाण्यासाठी खरेदी केल्यास नागरिकांना लॅब मध्ये जाण्याची आवश्यकता लागणार नसून त्यामुळे वेळ व खर्च वाचेल, असे प्रतिपादन महापौर नितीन काळजे यांनी केले. बुधवार दि. ०८ नोव्हेंबर २०१७ रोजी महापौर कार्यालयात झालेल्या या कार्यक्रमास आरोग्य वैद्याकीय अधिकारी डॉ. अनिल रॉय, प्रशासन अधिकारी बजरंग आवारी आदी उपस्थित होते. बायोसेन्स टेक्नोलॉजी द्वारे उत्पादीत सर्व वैद्यकीय उपकरणे ही त्वरीत चाचणी करुन रोग निदान करण्याच्या हेतूने विकसीत व निर्माण करण्यात आले असल्याचे यावेळी महापौर नितीन काळजे यांनी सांगितले. बायोसेन्स टेक्नोलॉजी ही ठाणे स्थाईक डॉक्टर्स आणि आय.आय.टी इंजिनियर्स द्वारा स्थापित भारतीय बनावटीचे वैद्यकीय चाचणीउपकरणे निर्मीत करणारी कंपनी आहे. या कंपनीचे प्रतिनिधी डॉ. अभिषेक सेन, डॉ.अनुराग श्रीवास्तव, जितेंद्र सोनार यांनी महापौर नितीन काळजे यांना त्यांचे कार्यालयात सदर मशिनद्वारे करण्यात येणा-या विविध चाचण्यांचे (तपासणी) प्रात्यक्षिक दाखविले. या कंपनी द्वारा विकसीत केलेल्या Remote Dignostic Kit च्या सहाय्याने विविध प्रकारच्या वैद्यकीय चाचण्या, जसे हिमोग्लोबीन चाचणी ( शरिराला इजा न करता) युरीन (रुटीन), मलेरीया,डेंग्यू, चिकन गुनिया, युरीनरी प्रेग्नंसी, रक्त शर्करा, रक्त दाब, ऑक्सीजन संपृक्तता इत्यादी चाचण्या केल्या जातात.
ADDRESS
VS News, Khararwadi,
Pimpri-Chinchwad
CONTACTS
Email: vsnews24x7@gmail.com
Phone: +91 91724 53002