व्हीएस न्यूज – महापालिका आणि क्रीडा विभागाकडून ठिकठिकाणी बॅडमिंटन हॉल बांधण्यात आलेले आहेत. या ठिकाणी खेळण्यासाठी नागरिकांना आपला ग्रुप तयार करून “ऑनलाइन बुकिंग’रावी लागते. मात्र या “बुकिंग’मध्येच“सेटींग’ होत असल्याचा आरोप माजी विरोधी पक्षनेते संतोष बारणे यांनी केला आहे.
यासंदर्भात संतोष बारणे यांनी पिंपरी-चिंचवड महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांना निवेदन दिले असून याप्रकरणाच्या चौकशीची मागणी केली आहे. त्यांनी निवेदनात म्हटले आहे की, शहरामध्ये नागरिकांच्या सोईसाठी महापालिकेच्या माध्यमातून क्रीडा विभागातर्फे सुसज्ज असे एकुण 11 बॅडमिंटन हॉल बांधण्यात आले आहेत. या ठिकाणी खेळण्यासाठी आपला ग्रुप व वेळ याची “ऑनलाइन बुकींग’ करणे गरजेचे आहे. यासाठी महापालिकेने क्रीडा विभागाचे स्वतंत्र संकेतस्थळ देखील उपलब्ध केले आहे. “बुकींग’ खुल्या होण्याच्या वेळांविषयीची माहिती महापालिकेच्या संकेतस्थळासह क्रीडा संकेतस्थळावरही दिली जाते.
त्यानुसार, नागरीक “बुकींग’ करतात. मात्र, विशिष्ट वेळेचे काही ठराविक लोकांनाच “बुकींग’ मिळते. इतरांना मात्र त्या वेळेची “बुकींग’ उपलब्ध होत नाही. क्रीडा विभाग आणि बुकींग करणारा संगणक विभाग यांच्या संगनमताने तर हे“सेटींग’ होत नाही, अशी चर्चा खेळाडूंमध्ये आहे. अनेक खेळाडूंना बुकींग अभावी बॅडमिंटनच्या सरावाला मुकावे लागत आहे. त्यामुळे त्यांच्यामध्ये महापालिकेच्या कारभाराविरोधात नाराजी आहे. याबाबत तोडगा काढणे गरजेचे असून बॅडमिंटनसाठीच्या “ऑनलाइन बुकींग’च्या प्रक्रियेची सखोल चौकशी करण्याची मागणी संतोष बारणे यांनी केली आहे.
ADDRESS
VS News, Khararwadi,
Pimpri-Chinchwad
CONTACTS
Email: vsnews24x7@gmail.com
Phone: +91 91724 53002