Skip to content

VS News

Pimpri-Chinchwad · Pune

Breaking
अखिल भारतीय छावा मराठा युवा संघटनेचे पदाधिकारी मच्छिंद्र चिंचोळे यांच्यावर विनयभंगाचा गुन्हा दाखलपिंपरी-चिंचवड बार असोसिएशनच्या सभेत महत्त्वपूर्ण निर्णय; महिला आरक्षणासह विविध ठराव मंजूरपाणी बचतीसाठी महापालिका ॲक्शन मोडवर! निष्काळजी कर्मचाऱ्यांवर शिस्तभंगाची कारवाईरुग्णालयातच शिस्तीचे धिंडवडे! सुरक्षारक्षकाच्या वर्तनावर संतापजनक प्रश्नचिन्ह!अभिजात मराठी भाषा सप्ताहात बालगीतांची मैफल रंगली; चिमुकल्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाददापोडीच्या विषारी दारूप्रमाणेच सांगवी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील गॅस चोरीही धोकादायक!PMPML कर्मचाऱ्यांच्या सातव्या वेतन आयोगाच्या थकबाकीसाठी भाजपा कामगार मोर्चाचे निवेदनदोन पदांवर एकाच व्यक्तीची वर्णी; भाजपच्या निष्ठावंत कार्यकर्त्यांचा संतापपीसीयूमधील उच्च तंत्रज्ञान सुविधांचा लाभ घेऊन विद्यार्थ्यांनी कौशल्य सिद्ध करावे : हर्षवर्धन पाटीलकामगार नेते यशवंत भोसले यांना वाढदिवसाच्या शुभेच्छानिष्ठावंत शिवसैनिक गणेश आहेर यांची शिवसेना पिंपरी-चिंचवड उपशहरप्रमुखपदी निवडमराठवाडा मुक्ती संग्राम दिनाचा पिंपरी-चिंचवड महापालिकेला विसर?उन्नतीच्या ‘स्वर निनाद’ मैफिलीला रसिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद हिंदुस्थान अँटिबायोटिक्स शाळा २००३ बॅचच्या रियुनियनमध्ये रंगला गुरु-शिष्य स्नेहसोहळाकंत्राटी व मानधन कर्मचाऱ्यांनाही ऑनलाइन पगार स्लिप द्या; हनुमंत लांडगे यांची महापालिका आयुक्तांकडे मागणीसंघर्ष, साधना म्हणजे आशाताई - श्रेया घोषाल पवना धरण 100 टक्के भरले; 15 टक्के पाणी कपात तात्काळ रद्द करा – जयेश चौधरीराष्ट्रीय मागासवर्गीय आयोगाचा बनावट प्रतिनिधी;धर्मेंद्र सोनकरवर गुन्हा दाखल!'पाणीप्रश्न निकाली काढणार'; भामा आसखेड योजनेची कामे मुदतीत पूर्ण करण्याचे आयुक्तांचे आदेशआषाढी वारीत ‘लालपरी’ची दमदार कामगिरी; ५,५०० बसेसमधून ९ लाखांहून अधिक भाविकांचा सुरक्षित प्रवासऔंध जिल्हा रुग्णालयातील पदोन्नतीचा प्रश्न रखडला?; कर्मचाऱ्यांमध्ये तीव्र नाराजीमोशी कचरा डेपोवरील भार कमी करण्यासाठी पर्यायी जागांचा शोध सुरूविद्यार्थी आंदोलनाचा विजय; धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामाजंजीरा किल्ल्यावर भगवा झेंडा लावण्याची मागणी; तीन महिन्यांत निर्णय न झाल्यास आंदोलनाचा इशारामोशी कचरा डेपो दुर्घटनेतील मृत कामगारांना न्याय मिळावा; दोषींवर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची सर्वपक्षीय विरोधी पक्षांचे प्रतिनिधींची मागणीमोशीतील कचरा प्रश्नावर जनप्रतिनिधी आक्रमक; अन्य मतदारसंघांचा कचरा स्वीकारण्यास नकारमोरवाडी न्यायालयात न्यायाधीशांची संख्या वाढली; मात्र कर्मचारी व मूलभूत सुविधांचा प्रश्न कायमभाजपा प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत पिंपरी-चिंचवडमध्ये महाबैठक; पदवीधर मतदार नोंदणी व रक्तदान मोहिमेला गती देण्याचे निर्देशबालाजीनगर एसआरए प्रकल्पात ५०० चौ. फूट घरांसह सर्व आधुनिक सुविधांची मागणी; अन्यथा जनआंदोलनाचा इशारामतदार जनजागृतीसाठी जयेश शिवराज चौधरी यांचा पुढाकार; SIR प्रक्रियेसाठी नागरिकांना मोफत मार्गदर्शनपर्यावरण संरक्षणासाठी एसटीपी अनिवार्यच; पिंपरी चिंचवड चाकण हाऊसिंग सोसायटी संघटनेची भूमिकापिंपरी चिंचवड पत्रकार संघ आयोजित कार्यक्रमात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या महिलांचा सन्मान पिंपरीत नरेश भाऊ जीनवाल युवा मंचाच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज जयंती उत्साहात साजरीसागर सूर्यवंशी यांचे फ्लेक्स काढले! विरोधकांना कसली भीती!जिजाऊ महिला प्रतिष्ठान व नवनाथ नढे सोशल फाउंडेशन तर्फे न्यू होम मिनिस्टर कार्यक्रमाचे आयोजन कामगारनेते यशवंतभाऊ भोसले यांच्या नेतृत्वात अल्फा लवाल लिमिटेड कंपनीची बैठक संपन्न व श्रमिक नेते बाबा आढाव यांना वाहिली श्रद्धांजली!पिंपरी चिंचवड महानगरपालिका सेवकांची सहकारी संस्था मर्यादितला पुणे विभागातून प्रथम क्रमांक.काळेवाडी पोलीस स्टेशन तपास पथकाची उत्कृष्ट कामगिरी; वाहन चोरीचे १० गुन्हे उघड, २० दुचाकी हस्तगत. स्पर्धेच्या काळात संघर्ष केल्या शिवाय काहीही मिळत नाही – ॲड. गणेश सातपुतेसंत तुकाराम नगर येथे भाजप आणि राष्ट्रीय समिक आघाडी यांच्या संयुक्त विद्यमाने आषाढी एकादशी निमित विविध कार्यक्रमाचे आयोजन

भोसरी

जागतिक मधुमेह दिनानिमित्त भोसरीत डायबेटिस फेस्टिवल संपन्न

· 106 reads

जागतिक मधुमेह दिनानिमित्त भोसरीत डायबेटिस फेस्टिवल संपन्न

नंदा फुगे यांना मधुमेह विजेता पुरस्कार

Your ad here

व्हीएस न्यूज - रुग्णाला असणा-या आजाराबाबत मनातील नकारात्मकता दुर्लक्षित करुन मानसिक शक्तीव्दारे आजारांवर नियंत्रण मिळविण्याचा मार्ग अध्यात्म दाखविते. रोगाचे भय त्याचे मुळ असते त्यासाठी हसणे हे उत्तम औषध आहे. व्याधीकडे देखील विनोदाने बघावे. जीवनात आनंद निर्माण करण्याचा मार्ग अध्यात्मातून जातो. अध्यात्मासाठी गुरु पाहिजे. मनावर ताबा मिळविण्याचा रस्ता गुरु नमनाव्दारे दाखवितो. गुरुंपुढे वमन केले जाते. गुरुंच्या सूचना पाळाव्या लागतात. त्याप्रमाणे रुग्णाने डॉक्टरांच्या सुचनांचे पालन केले तर कोणत्याही आजारावर नियंत्रण मिळविणे शक्य आहे. असे मार्गदर्शन डॉ. संजय उपाध्ये यांनी केले.

जागतिक मधूमेह दिनानिमित्त मंगळवारी (दि. 14 नोव्हेंबर) भोसरीतील कै. अंकुशराव लांडगे सभागृह येथे डॉ. गायकवाड डायबेटिस सेंटरच्या वतीने डायबेटिस फेस्टिवलचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी मधुमेह तज्ञ डॉ. अनु गायकवाड, डॉ. जयश्री तोडकर, महाराष्ट्र साहित्य परिषद भोसरी शाखाध्यक्ष मुरलीधर साठे, कार्याध्यक्ष पुरुषोत्तम सदाफुले, दिगंबर ढोकले, लायन्स क्लब भोजापूर गोल्डचे अध्यक्ष डॉ. दिपाली कुलकर्णी, सचिव सुदाम भोरे,खजिनदार अश्विनी भोसले, संतोष सोनावळे, अविनाश करपे, नगरसेवक विलास मडेगिरी, प्रियांका बारसे, माजी नगरसेवक राजाभाऊ गोलांडे आदी उपस्थित होते.

लायन्स क्लबचे उपप्रांतपाल ओमप्रकाश पेठे यांच्या हस्ते महोत्सवाचे उद्‌घाटन करण्यात आले. डॉ. संजय उपाध्ये यांच्या हस्ते नंदा फुगे यांना मधूमेह विजेता पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. यावेळी रक्तशर्करा तपासणी, डोळे व पायांच्या नसांची तपासणी, रक्तदाब, बीएमआय, बॉडी फॅट ॲनालायझर आदी तपासण्या करण्यात आल्या. तसेच डायबेटिक फुटवेअरची माहिती, मधुमेह माहिती पुस्तिका, सीडी देऊन मधुमेहाविषयी जनजागृती करण्यात आली.

डॉ. अनु गायकवाड मार्गदर्शन करताना म्हणाले की, प्रत्येक मधुमेही रुग्ण हा मधुमेह तज्ञ झाला तर मधुमेहावर विजय मिळविणे शक्य आहे. जीपीएसची (GPS=Grans,Potato,Suger) त्रीसुत्री अंमलात आणावी. डॉ. जयश्री तोडकर यांनी बेरीयाट्रिक सर्जरी विषयी माहिती देताना सांगितले की, पंच्चानव टक्के लोकांना मधुमेह लठ्ठपणामुळे होते. लठ्ठपणा व मधुमेह हातातहात घालून येणारे आजार आहेत. याकडे दुर्लक्ष केल्यास शरीरातील इतर अवयवांना हानी पोहचते. ज्यांचा बीएमआय पंचवीस आहे अशी व्यक्ती लठ्ठपणाकडे वाटचाल करीत आहे. तर तीस बीएमआय असणारी व्यक्ती लठ्ठ समजली जाते. लठ्ठपणा हा आजार आहे. सध्याच्या परिस्थितीत अनेक तरुण, तरुणी लठ्ठपणामुळे त्रस्त आहेत. यामुळे नपुंसकत्व, वंध्यत्व, नैराश्य आणि हार्मोन्समध्ये अनैसर्गिक बदल होतात. लठ्ठपणाला वीस टक्के मनाचा ताबा तर एैंशी टक्के शरीराचा ताबा कारणीभूत असतो. असेही डॉ. तोडकर यांनी सांगितले. स्वागत व प्रास्ताविक डॉ. अनु गायकवाड, सुत्रसंचालन दिगंबर ढोकले आणि आभार डॉ. शंकर गायकवाड यांनी मानले.

Your ad here