व्हीएस न्यूज – बीन्स कंटेनर खरेदीतील तीन ठेकेदारांना काळ्या यादीत टाकावे, अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते रमेश वाघेरे यांनी आयुक्त श्रावण हर्डीकर यांच्याकडे केली आहे. याबाबत त्यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले की,बीन्स कंटेनर खरेदीत तीन ठेकेदारांनी भाग घेतला. त्यात निर्मिती इंजिनिअर कॉर्पोरेशन व रेखा इंजिनिअर वर्कर यांना काम मिळाले. परंतु, तिसरा ठेकेदार याने निविदा प्रक्रियेत भाग घेतला, त्या मे. पी. शेषाद्री ऍन्ड कॉर्पोरेशन हा ठेकेदार वरील काम घेतलेला आहे. त्यांचे मालकही एकच असल्याचा संशय आहे. त्यामुळे या निविदा प्रक्रियेतील रिंग झाल्याची दाट शक्यता आहे. यामुळे तिन्ही ठेकेदारांना काळ्या यादीत टाकण्यात यावे, अशी मागणी वाघेरे यांनी केली आहे.