व्हीएस न्यूज – एका क्लिनरने आपल्या सहकारी चालकावर चाकू हल्ला केला. या घटनेत ट्रक चालक गंभीर जखमी झाला असून, त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहेत. ही घटना शुक्रवारी (दि. 17) सकाळी अकराच्या सुमारास निगडीतील अंकुश चौकात घडली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ट्रक चालक रोशन वर्मा (वय 27, रा. डोंबिवली) आणि क्लीनर खिलेश्वर कुमार यादव (रा. बिहार) हे एकाच माल वाहतूक ट्रकवर कामाला होते. याप्रकरणी आरोपी खिलेश्वर कुमार यादवला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
क्लीनर खिलेश्वरला नेहमी चालकापासून धोका असल्याचे भासत होते. त्यातूनच त्याने हे कृत्य केले. सकाळी डोंबिवली येथून भोसरीमध्ये पत्रे पोहचवण्यासाठी हे दोघे ट्रक घेऊन आले होते. मात्र, निगडीतील अंकुश चौकात आल्यानंतर अचानकपणे खिलेश्वरने चालकाच्या पोटात चाकूने वार केले यात चालक गंभीर जखमी झाला. निगडी पोलीस तपास करत आहेत.