एशियन ओसिएन स्टँडर्ड सेटर गृपच्या उपाध्यक्षपदी शिवाजी झावरे
पिंपरी- चिंचवड
2017-11-18
व्हीएस न्यूज - एशियन ओसिएन स्टॅंडर्ड सेटर ग्रुपच्या उपाध्यक्षपदी नियुक्ती झाल्याबद्दल शिवाजी झावरे यांचा इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउटंट ऑफ इंडिया (आयसीएआय) पिंपरी-चिंचवड शाखेच्या वतीने नागरी सत्कार करण्यात आला.
पश्चिम भारत प्रादेशिक परिषदेचे अध्यक्ष विष्णू अगरवाल, उपाध्यक्ष सर्वेश जोशी, पिंपरी-चिंचवड शाखेचे अध्यक्ष रवींद्र नेर्लीकर, अमोद भाटे, युवराज तावरे, प्राजक्ता चिंचोळकर, सुहास गार्डी, संतोष संचेती, अनिल अगरवाल,सचिन बन्सल आदी उपस्थित होते. हा कार्यक्रम निगडी येथील शाखेच्या सभागृहात संपन्न झाला. एशियन- ओशिएन स्टॅंडर्ड सेटर्स ग्रुप ही आशियाई प्रदेशातील लेखा मानक संबंधित संघटना आहे. आंतरराष्ट्रीय वित्तीय मानकांचा अवलंब करण्यासंबंधित चर्चा तसेच उच्च गुणवत्तायुक्त जागतिक लेखा मानकांच्या विकासात सहभागी होण्याच्या उद्देशाने या संघटनेची स्थापना करण्यात आली असून शिवाजी झावरे हे या संघटनेच्या उपाध्यक्षपदी नियुक्त होणारे पहिलेच भारतीय सनदी लेखापाल ठरले आहेत. शेतकरी आणि कृषी क्षेत्रातील व्यक्तींना पूरक ठरतील असे मानक बनविण्याचे आपले उद्दिष्ट असल्याचे शिवाजी झावरे यांनी यावेळी सांगितले.