सामाजिक कार्यकर्ते संतोष चव्हाण यांचा आरोप
व्हीएस न्यूज – पोलिसांविरोधात आंदोलन केल्याने भाजप नगरसेवक तुषार हिंगे याच्या सांगण्यावरुन निगडी पोलिसांनी खोट्या गुन्ह्यात अडकविल्याची तक्रार सामाजिक कार्यकर्ते संतोष रामा चव्हाण यांनी सहाय्यक पोलीस आयुक्तांकडे केली आहे. या खोट्या तक्रारीमधून वगळण्याची मागणी या निवेदनात केली आहे.
नगरसेवक तुषार हिंगे व काही तरुणांमध्ये भांडण झाले होते. याचे पर्यावसन यमुनानगर चौकीसमोरच प्राणघातक हल्ल्यात झाले होते. मात्र, नगरसेवक तुषार हिंगे याच्याविरोधात तरुणांची तक्रार घेण्यास निगडी पोलीस टाळाटाळ करत होते. निगडी पोलिसांच्या या बेजबाबदार वर्तणुकीच्या निषेधार्थ या तरुणांनी पिंपरीतील डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकात आमरण उपोषण केले होते.
उपोषणकर्त्यांमध्ये संतोष चव्हाण यांचा देखील समावेश होता. त्यानंतर नगरसेवक तुषार हिंगेसह त्याच्या साथीदारांवर निगडी पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला होता. मात्र, हिंगे यांच्या सांगण्यावरुन निगडी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक शंकर आवताडे यांनी आपल्यावर खोटा गुन्हा दाखल केल्याची चव्हाण यांची तक्रार आहे. दरम्यान, नगरसेवक हिंगे याच्यावर गुन्हा दाखल असताना देखील, त्याला अटक करण्यास टाळाटाळ केली जात असल्याचा आरोप चव्हाण यांनी केला आहे.
ADDRESS
VS News, Khararwadi,
Pimpri-Chinchwad
CONTACTS
Email: vsnews24x7@gmail.com
Phone: +91 91724 53002