हॅरिस ब्रिजवरून ८ महिन्याच्या बाळासहउडी घेत महिलेची आत्महत्या.
दापोडी
2017-11-20
दापोडी येथील हॅरिस ब्रिजवरून ८ महिन्याच्या बाळासह उडी घेत महिलेने आज सायंकाळी पाचच्या सुमारास आत्महत्या केली.
व्हीएस न्यूज - सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, शहापुरी असलम शेख (वय २०, रा. वाकड), असे महिलेचे नाव असून अग्निशामक दलाच्या जवानांनी महिलेचा मृतदेह बाहेर काढला असून बाळाचा शोध सुरू आहे. घटनास्थळी औंध अग्निशामक दलाची गाडी असून जवान बाळाचा शोध घेत आहेत. या घटनेनंतर परिसरातील नागरिकांनी मोठी गर्दी केली होती.