बाणेर येथील पुणे-बँगलोर महामार्गावर तरुणाला मारहाण करत चोरट्यांनी दुचाकी पळवली
बाणेर
2017-11-20
व्हीएस न्यूज - पार्टीवरून घरी परतणा-या अक्षय राजू टोपे या तरुणाला तीन अनोळखी इसमांनी बाणेर येथील पुणे-बँगलोर महामार्गावर मारहाण करून तरुणाची दुचाकी चोरली. ही घटना आज (सोमवारी) पहाटे तीनच्या सुमारास घडली.
अक्षय राजू टोपे (वय 23 रा. भारत कॉलनी, नढेनगर, काळेवाडी) यांनी हिंजवडी पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, टोपे हा हॉटेल न्यू सायबा येथून मित्रांसोबतच्या पार्टीनंतर घरी त्याच्या (एमएच14 एफ.जे.7339) या दुचाकीवरून परतत असताना पाठीमागून काळ्या रंगाच्या मोटर सायकलवरून आलेल्या तीन अनोळखी इसमांनी गाडी टोपे यांच्या दुचाकीला आडवी लावली व त्याला हाताने मारहाण करत त्याची किमान २० हजार रुपये किमतीची दुचाकी जबरदस्तीने पळवली.
हिंजवडी पोलीस ठाण्यात तीन अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल केला असून पोलीस अधिक तपास करत आहेत.