व्हीएस न्यूज – शहरातील आकुर्डी परिसरात दहशत माजविणाऱ्या रावण सेना टोळीचा म्होरक्या अनिकेत जाधव (वय 22, रा. रावेत) याचा डोक्यात दगड घालून खून करण्यात आला आहे. शितळादेवी मंदिर परिसरात सोमवारीमध्यरात्री पावणेबाराच्या सुमारास ही घटना घडली.
मागील काही दिवसांपासून आकुर्डी परिसरात रावण सेनेची दहशत आहे. अनिकेत हा त्या टोळीचा म्होरक्या होता. त्याच्यावर खून, खुनाचा प्रयत्न असे वेगवेगळे गुन्हे दाखल आहेत. काही दिवसापूर्वी महाकाली टोळीचा म्होरक्या हनम्या शिंदे याच्यावर गोळीबार करून ठार मारण्याचा प्रयत्न केल्या प्रकरणात दाखल गुन्ह्यात तो फरार होता. दरम्यान, टोळी वर्चस्वातून अनिकेतचा खून झाल्याचा प्राथमिकअंदाज पोलिसांनी वर्तविला असून आरोपींचा शोध सुरू आहे.