व्हीएस न्यूज – दरवाजाचे कुलूप उचकटून चोरट्यांनी भरदिवसा घरातील साडेसहा लाखांचा ऐवज चोरून नेला. ही घटना 6 नोव्हेंबर रोजी दुपारी तीन ते पाचच्या दरम्यान निगडी प्राधिकरणात घडली.
सुजित सुभाष डागा (वय 23, रा. डागा रेसिडेन्सी, प्राधिकरण, निगडी) यांनी निगडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. 6 नोव्हेंबर रोजी दुपारी तीन वाजता डागा हे कामानिमित्त घराबाहेर गेले होते. सायंकाळी साडेपाच वाजता ते घरी आले असता चोरीचा प्रकार उघडकीस आला. चोरट्यांनी शयनगृहातील कपाटातील अडीच लाखाची रोकड आणि 10 तोळे सोन्याचे दागिने असा 6 लाख 40 हजार रुपयांचा ऐवज चोरून नेला. सहायक पोलीस निरीक्षक गणेश खारगे तपास करत आहेत.