व्हीएस न्यूज– कॉलेजमधून जाऊन येतो, असे घरातून सांगून घराबाहेर पडलेला महाविद्यालयीन युवक बेपत्ता झाल्याची घटना कृष्णानगर चिंचवड येथे सोमवारी (दि.20) सकाळी सातच्या सुमारास घडली.
वैभव पांडुरंग बिराजदार (वय 17, रा. कृष्णानगर, चिंचवड) असे बेपत्ता झालेल्या तरुणाचे नाव आहे. या प्रकरणी त्याचे वडील पांडुरंग बिराजदार यांनी निगडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार,वैभव हा निगडी येथील एका कॉलेजमध्ये शिक्षण घेत आहे. काल सकाळी सात वाजता कॉलेजला जात असल्याचे घरच्यांना सांगून तो निघाला. परंतु रात्री उशीरापर्यंत तो घरी परतला नाही. वैभवच्या घरच्यांनी त्याच्या मित्र, वर्ग शिक्षक आणि इतरत्र त्याचा शोध घेतला. परंतु, तो मिळून न आल्याने त्याच्या वडिलांनी निगडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. सहायक पोलीस निरीक्षक योगेश आव्हाड तपास करीत आहेत.