व्हीएस न्यूज - आज ज्या ठिकाणी मी आहे तिथून मागे वळून पाहिले तर दुसरे तिसरे कोणी नसून मीच आहे. इतकी मी आता पुढे गेलीय. ना दुःख ना आनंद यात खचले असते तर कधीच मरून गेले असते. जगतेय ती फक्त माझ्या लेकरांसाठी, असे मत अनाथांची माय सिंधुताई सपकाळ यांनी चिंचवड येथे व्यक्त केले.
इनरव्हील क्लब पिंपरी-चिंचवड यांच्या संयुक्त विद्यमाने त्यांचा सन्मान सोहळा आयोजित करण्यात आला होता. त्यावेळी त्या बोलत होत्या. यावेळी इनर व्हील निगडी प्राईडच्या अध्यक्षा सविता राजापूरकर, पिंपरीच्या अध्यक्षा संगीता देशपांडे, पिंपरी स्टारच्या अध्यक्षा राधिका माकन, निगडी झेनेक्स संजुश्री मुनोत, क्लबचे सभासद व रोटरीयन आदी उपस्थित होते. यावेळी इनरव्हील क्लबच्या वतीने सिंधुताई सपकाळ यांच्या संस्थेस 51 हजाराची देणगी स्वरूपात चेक देण्यात आला.
त्या पुढे म्हणल्या की, जगा, ठामपणे स्वाभिमानाने जगा. तुम्हीच जगू व जगवू शकता. माझी लेकरच माझी उर्मी आहेत. संकटांनी मला उभे केले. मी संसारात रमले असते तर एक दोन मुलांचा सांभाळ करू शकले असते. मी माझ्या लेकरांची माय बनले, त्यांना सक्षम करू शकले, असे त्या म्हणाल्या. प्रास्ताविक सविता राजापूरकर यांनी केले. सूत्रसंचालन सुमन शिरूर यांनी केले. आभार प्रिती पाटील यांनी मानले.
ADDRESS
VS News, Khararwadi,
Pimpri-Chinchwad
CONTACTS
Email: vsnews24x7@gmail.com
Phone: +91 91724 53002