प्रा. रवंदळे यांची टिपीओ असोसिएशनच्या अध्यक्षपदी निवड
पिंपरी – चिंचवड
2017-11-23
व्हीएस न्यूज– पिंपरी-चिंचवड एज्युकेशन ट्रस्टच्या (पीसीईटी) सेंट्रल ट्रेनिंग प्लेसमेंटचे अधिष्ठाता प्रा. शितलकुमार रवंदळे यांची महाराष्ट्र असोसिएशन ऑफ ट्रेनिंग ऍन्ड प्लेसमेंट ऑफीसर्सच्या (टीपीओ) अध्यक्षपदी निवड झाली.
मुंबईतील खालापूर येथे पार पडलेल्या राज्यस्तरीय बैठकीत एकमताने प्रा. रवंदळे यांची निवड करण्यात आली. राज्यातील 250 अभियांत्रिकी महाविद्यालयातील प्लेसमेंट ऑफीसर्स आणि प्रतिनिधी उपस्थित होते. अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्यांच्या रोजगार क्षमता वृद्धिंगत करून त्यांना सुयोग्य ठिकाणी कॅम्पस मधून नोकरी मिळावी या उद्देशाने असोसिएशनची स्थापना करण्यात आली आहे.
पुढील काळात राज्यातील सर्वंच विद्यापीठांमध्ये अशा प्रकारचे असोसिएशन मंडळ स्थापन करण्यात येणार आहे. असोसिएशनच्या कार्यकारी संचालकपदी सांगलीतील वालचंद महाविद्यालयाचे प्रा. संजय धायगुडे, सचिवपदी मुंबईच्या एससीओईचे प्रा. संजय जाधव यांची निवड करण्यात आली आहे.