व्हीएस न्यूज– रेल्वेच्या धडकेत एका ज्येष्ठ नागरिकाचा मृत्यू झाला. ही घटना पिंपरी रेल्वे स्टेशन येथे 177/28 किलोमीटर येथे सायंकाळी पावणे सातच्या सुमारास घडली. मृताची ओळख पटलेली नाही.मयत व्यक्तीचे वय अंदाजे 65 वर्षे असून, उंची पाच फूट चार इंच, किरकोळ शरीरयष्टी, रंग काळासावळा, सरळ नाक, डोक्यावर पांढरे केस, अंगात पांढरा शर्ट, राखाडी निळी बरमुडा व लाल बनियन घातले आहे. या वर्णनाच्या व्यक्तिची माहिती असलेल्या नागरिकांनी पिंपरी रेल्वे पोलिसांशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.