व्हीएस न्यूज – दिवाळीच्या तोंडावर महागाईचा भडका उडाल्याच्या निषेधार्थ भारतीय मायनॉरिटीज सुरक्षा महासंघाच्या वतीने केंद्र सरकारच्या विरोधात सोमवारी निदर्शने करण्यात आली. भाजप सरकारच्या नावाने “शिमगा’ करत निषेध व्यक्त करण्यात आला.
प्रदेशाध्यक्ष मारुती कदम यांच्या नेतृत्वाखाली पिंपरीतील डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा चौकात हे आंदोलन झाले. यावेळी महिला प्रदेशाध्यक्षा डॉ. रंजना पेडणेकर म्हणाल्या की, केंद्र सरकारच्या चुकीच्या धोरणांमुळे पेट्रोल, डिझेल, गॅस अशा जीवनावश्यक वस्तुंचे दर गगनाला भिडले आहे. व्यापाऱ्यांवर लादलेली जीएसटी चूकीची असल्याचे लक्षात आल्यानंतर आता “जीएसटी’मध्ये सुधारणा करण्यात आली आहे. हे सरकारचे अपयश आहे. गो हत्या बचावच्या नावाखाली निरपराध नागरिकांचे खून सत्र सुरु आहे. न्यायालयाने फटकारल्यानंतरही केंद्र सरकार या प्रश्नाकडे गांभिर्याने पाहत नाही, ही दुर्दैवी बाब आहे.
प्रदेशाध्यक्ष मारुती कदम यांनी राज्य सरकारच्या चुकीच्या निर्णयावर टीका केली. शेतकऱ्यांना जाहीर केलेली कर्जमाफी दिवास्वप्नच ठरली आहे. अंगणवाडी सेविकांना मानधनवाढीसाठी जेलभरो आंदोलन करावे लागले. याशिवाय पिंपरी-चिंचवड शहरातील गुन्हेगारी दिवसेंदिवस वाढत असताना, स्वतंत्र पोलीस आयुक्तालयाचा प्रश्न सोडविण्यात चालढकल केली जात आहे. शहराच्या कायदा सुव्यवस्थेच्यादृष्टीने ही बाब योग्य नाही. त्यामुळे शहराच्या पोलीस आयुक्तालयाचा प्रश्न त्वरित मार्गी लावण्याची गरज आहे.
या निदर्शनामध्ये अमित कांबळे, कल्याण अडागळे, संतोष खाडे, रवींद्र आडागळे, चंद्रकांत मुळे, आमीर शेख, दशरथ वाघमारे, रितेश देशमुख, पार्वती कांबळे, वंदना अडागळे, विजया बेंदळे, रेश्मा डोगरा, रंजना भोसले, नसीम कांबळे, सुषमा सोनवणे, मंजुषा वाघमारे, सतिश कदम आदी सहभागी झाले होते.
ADDRESS
VS News, Khararwadi,
Pimpri-Chinchwad
CONTACTS
Email: vsnews24x7@gmail.com
Phone: +91 91724 53002