व्हीएस न्यूज– महिलेला बोलण्यात गुंतवून ठेवत, नजर चुकवून हात चलाखीने दीड लाखांचे सोन्या-चांदीचे दागिने चोरट्याने चोरुन नेले. ही घटना तळवडे येथील भवानी ज्वेलर्स या सराफी पेढीत 18 नोव्हेंबरला सकाळी साडेनऊ ते दहाच्या सुमारास घडली. अनिल बिले (वय 40, रा. रुपीनगर, तळवडे) यांनी निगडी पोलिसांत फिर्याद दिली आहे. याप्रकरणी एका 35 वर्षीय अनोळखी चोरट्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
फिर्यादी अनिल बिले यांची तळवडेत तुळजा भवानी ज्वेलर्स नावाची सराफी पेढी आहे. याठिकाणी त्यांची आई असताना, दागिने पाहण्याच्या बहाण्याने एक जण आला. त्यांच्या आईला बोलण्यात गुंतवून नजर चुकवत प्लास्टिकच्या डब्यातील दीड लाख रुपये किंमतीचे दागिने चोरुन नेले. निगडी पोलीस तपास करत आहेत.