विद्यार्थ्यांनी स्वतःच्या क्षमता जाणून घ्याव्यात - प्रा.डॉ.आनंद भालेराव यांचे मत
पुणे
2017-11-25
व्हीएस न्यूज - विद्यार्थ्यांनी स्वतःच्या क्षमता जाणून घ्याव्यात क्षणिक गुणांवर स्वतःला बंधनात ठेऊ नका. आपल्या आंतरिक शक्तीची आणि क्षमताची ओळख करून घ्या असे प्रतिपादन भारती विध्यापीठ कॉलेज ऑफ इंजिनीअरिंग चे प्राचार्य डॉ. आनंद भालेराव यांनी केले. ते धनकवडी येथील कॅम्पस येथे आयोजित महाविद्यालयाच्या
वार्षिक स्नेहसंमेलनातील लिंक्डिन एम टी व्ही गेट अ जॉब या मेळाव्यात बोलत होते. महाविद्यालयाने एम टी व्ही आणि लिंक्डिन यांच्या सहकार्याने " मिनिस्ट्री ऑफ ह्युमन रीसोर्स डेव्हलपमेंट" आणि ऑल इंडिया कौन्सिल फॉर टेक्निकल एज्युकेशन यांच्या कडून देण्यात येणाऱ्या इंटर्नशिप संदर्भात सहकार्य केले आहे या मेळाव्यात ६५० पेक्षा अधिक विद्यार्थ्यांना प्रमुख कपंनीच्या प्राधान्या नुसार इंटर्नशिप कार्यक्रमासाठी नाव नोंदणी करण्याला मदत करण्यात आली. मेळाव्यात घेण्यात आलेल्या विद्यार्थ्यांच्या मुलाखती विविध कंपन्यांना पाठवण्यात आल्याचे तेथील प्राचार्य नचिकेत कुलकर्णी यांनी सांगितले आहे.