व्हीएस न्यूज – चेन्नई येथे झालेल्या देशभरातील नामांकित महाविद्यालयांच्या गुणगौरव सोहळ्यामध्ये आकुर्डी येथील डी. वाय. पाटील इन्स्टिट्यूट ऑफ इंजिनिअरिंग, मॅनेजमेंट ऍन्ड रिसर्च महाविद्यालयाला व्हर्च्युसा कंपनीने “सेंटर ऑफ एक्सलन्स’ हा पुरस्कार प्रदान केला.
यावेळी प्राचार्य अनुपमा पाटील, डीन प्लेसमेंट जस्मिता कौर आदी उपस्थित होते. डी. वाय. पाटील शिक्षण संस्थेतर्फे विद्यार्थ्यांना आणि प्राध्यापकांना प्रशिक्षण, थेट रोजगाराच्या संधी, संस्थेबाहेरील विद्यार्थ्यांना देखील प्रशिक्षणाच्या संधी उपलब्ध करुन दिल्या आहेत. त्यामुळेच हे यश महाविद्यालय संपादन करू शकले आहे. महाविद्यालयाला हे यश मिळवून देण्यासाठी संस्थेचे अध्यक्ष व आमदार सतेज पाटील, निवृत्त संचालक कर्नल ए. के. जोशी, संगणक विभाग प्रमुख प्रतीक्षा शेवतेकर, कुलसचिव वाय. के. पाटील यांनी मार्गदर्शन केले.