व्हीएस न्यूज – पिंपरी-चिंचवड महापालिका व पुणे डीस्ट्रीक्ट ऍथलेटिक असोसिएशन यांच्या वतीने सिटी ऍथलेटिक असोसिएशन सहकार्याने आज (रविवारी) चऱ्होली येथे अर्ध मॅरेथॉन स्पर्धा घेण्यात आली. या स्पर्धेला खेळाडूंनी उत्स्फूर्त दिला. पुरुषांच्या गटात स्वप्नील सावंत तर महिलांच्या गटात यावेळी माजी महापौर कै. सादबा ऊर्फ आप्पासाहेब काटे महापौर चषक स्वाती गाढवे यांनी प्रथम क्रमांक पटकावत महापौर चषकावर मोहर उमटवली.
जिल्हास्तर 2017 अर्ध मॅरेथॉन स्पर्धेचे उद्घाटन महापौर नितीन काळजे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी सत्तारुढ पक्षनेते एकनाथ पवार, क्रीडा कला व सांस्कृतिक समितीचे सभापती लक्ष्मण सस्ते, शहर सुधारणा समिती सभापती सागर गवळी, नगरसदस्य राजेंद्र लांडगे, विलास मडिगेरी, नगरसदस्या सुवर्णा बुर्डे, सहाय्यक आयुक्त मनोज लोणकर, प्रशासन अधिकारी राजेश जगताप, क्रीडा अधिकारी रज्जाक पानसरे आदी उपस्थित होते.
या अर्ध मॅरेथॉन स्पर्धेचे खेळांडूना चऱ्होली, मोशी, चिखली, कुदळवाडी, स्पाईनरोड, संत ज्ञानेश्वर क्रीडा संकुल, इंद्रायणीनगर मार्गावरुन घेण्यात आली. तसेच स्पर्धेचा समारोप इंद्रायणीनगरातील संत ज्ञानेश्वर क्रीडा संकुलात पार पडला. या स्पर्धेतील विजेत्या स्पर्धकांना महापौर नितीन काळजे व सत्तारुढ पक्षनेते एकनाथ पवार यांच्या हस्ते बक्षिस व प्रमाणपत्राचे वितरण करण्यात आले. या प्रसंगी महापौर चषक अर्ध मॅरेथॉन स्पर्धेमध्ये विविध वयोगट आणि किलो मिटरनुसार झालेल्या स्पर्धेमध्ये विजेत्या स्पर्धकांना एकूण 4 लाख 49 हजार रुपयांची रोख बक्षिसांचे वितरण करण्यात आले.
या स्पर्धेत पुरुष खुला गट 21 कि.मी. स्पर्धेत प्रथम क्रमांक स्वप्नील सावंत (बक्षीस 51 हजार रुपये), व्दितीय क्रमांक सेहेंदर सिंग (बक्षीस 35 हजार रुपये), तृतिय क्रमांक किशोर गव्हाणे (बक्षीस 25 हजार रुपये) तर महिला खुला गट10 कि.मी. स्पर्धेत प्रथम क्रमांक स्वाती गाढवे (बक्षीस 51 हजार रुपये), व्दितीय क्रमांक मनिषा साळुंखे (बक्षीस 35 हजार रुपये), तृतीय क्रमांक विनया मालुसरे (बक्षीस 25 हजार रुपये) देण्यात आले.
18 वर्षीय शालेय मुले 6 कि.मी. स्पर्धेत प्रथम क्रमांक विकास पुनिया (बक्षीस 7 हजार रुपये), व्दितीय क्रमांक बाला किसन (बक्षीस 5 हजार रुपये), तृतीय क्रमांक अजय क्षीरसागर (बक्षीस 3 हजार रुपये) तर 18 वर्षीय शालेय मुली 6कि.मी. स्पर्धेत प्रथम क्रमांक पायल आमले (बक्षीस 7 हजार रुपये), व्दितीय क्रमांक पायल भालेकर (बक्षीस 5 हजार रुपये), तृतीय क्रमांक अंकिता कोळपे (बक्षीस 3 हजार रुपये) देण्यात आले.
16 वर्षीय शालेय मुले 4 कि.मी. स्पर्धेत प्रथम क्रमांक सौरभ अनिल (बक्षीस 5 हजार रुपये), व्दितीय क्रमांक सौरभ रावत (बक्षीस 3 हजार रुपये), तृतीय क्रमांक मोनु लाठर (बक्षीस 2 हजार रुपये) तर 16 वर्षीय शालेय मुली 4 कि.मी. स्पर्धेत प्रथम क्रमांक अनुष्का मोरे (बक्षीस 5 हजार रुपये), व्दितीय क्रमांक आदिती जगताप (बक्षीस 3 हजार रुपये), तृतीय क्रमांक श्रावणी कोल्हे (बक्षीस 2 हजार रुपये) देण्यात आले.
14 वर्षीय शालेय मुले 3 कि.मी. स्पर्धेत प्रथम क्रमांक जितेंद्र मोनु (बक्षीस 5 हजार रुपये), व्दितीय क्रमांक अजय चंद्र (बक्षीस 3 हजार रुपये), तृतीय क्रमांक साहिल खान (बक्षीस 2 हजार रुपये), तर 14 वर्षीय शालेय मुली 3 कि.मी. स्पर्धेत प्रथम क्रमांक सायली गांजाळे (बक्षीस 5 हजार रुपये), व्दितीय क्रमांक सपना चौधरी (बक्षीस 3 हजार रुपये), तृतीय क्रमांक मनाली रतनोजी (बक्षीस 2 हजार रुपये) यांना देण्यात आले.
ADDRESS
VS News, Khararwadi,
Pimpri-Chinchwad
CONTACTS
Email: vsnews24x7@gmail.com
Phone: +91 91724 53002