व्हीएस न्यूज – चिंचवड येथील श्री शिवछत्रपती शिवाजीराजे माध्यमिक विद्यालयात तालुकास्तरीय सातत्य पूर्ण व्यावसायिक विकास अविरत प्रशिक्षणाचा समारोप झाला. राष्ट्रीय माध्यमिक शिक्षा अभियान व महाराष्ट्र शासन आयोजित जिल्हा शैक्षणिक सातत्यपूर्ण व्यावसायिक विकास संस्था, पुणे जिल्हा परिषद माध्यमिक विभाग आणि चिंचवड येथील श्री शिवछत्रपती शिवाजीराजे माध्यमिक विद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने सुरू झालेल्या श्री शिवछत्रपती शिवाजीराजे माध्यमिक विद्यालयात तालुकास्तरीय सातत्य पूर्ण व्यावसायिक विकास अविरत प्रशिक्षणाचा समारोप झाला.
यावेळी शैक्षणिक सातत्यपूर्ण व्यावसायिक विकास संस्थेच्या राज्य समन्वयक पल्लवी देव आणि जिल्हा शैक्षणिक सातत्यपूर्ण व्यावसायिक विकास संस्था, पुणे येथील वरिष्ठ अधिव्याख्याता तथा संपर्क अधिकारी डॉ. ज्ञानेश्वर पाटील यांनी दोन दिवस प्रशिक्षणास उपस्थित असलेल्या शिक्षकांना मार्गदर्शन करून प्रशिक्षणाचा समारोप केला. यावेळेस विद्यालयाचे संस्थापक अध्यक्ष अण्णा जाधव यांनी संस्थेच्या वतीने मान्यवरांचा शाल श्रीफळ आणि ज्ञानेश्वरी भेट देवून सत्कार केला.
सेवांतर्गत प्रशिक्षणाचा उद्देश शालेय नेतृत्व या नात्याने मुख्याध्यापक व शिक्षकांचा सातत्याने व्यावसायिक विकास हा या अविरत प्रशिक्षणाचा मुख्य हेतू आहे. प्रशिक्षण सुरुवातीला दोन दिवस इंडक्शन कोर्स या स्वरुपात देण्यात आले असून उर्वरित 8 दिवस पुढे प्रात्याक्षिक व क्षेत्रभेटीच्या माध्यमातून पूर्ण करून घेतले जाणार आहे. प्रशिक्षणात माहिती तंत्रज्ञानाचा वापरावर विशेष भर देण्यात आला. संरक्षण शास्त्र, कलारसास्वाद व किशोरवयीन विद्यार्थ्यांना समजून घेणे या घटकांवर विशेष लक्ष देण्यात आले.
पिंपरी-चिंचवड महापालिका क्षेत्रातील 100 शाळांचे मुख्याध्यापक आणि वरिष्ठ शिक्षक सहभागी झाल्याने कार्यक्रमास उत्तम प्रतिसाद मिळाला. प्रशिक्षण जिल्हा शैक्षणिक सातत्यपूर्ण व्यावसायिक विकास संस्था, पुणेच्या प्राचार्या डॉ. कमलादेवी आवटे व प्रशासन अधिकारी बजरंग आवारी यांच्या नेतृत्वाखाली कार्यान्वित झाले होते. प्रशिक्षणासाठी तज्ज्ञ मार्गदर्शक म्हणून डॉ. सूर्यकांत आरेकर, एकनाथ बुरसे, उमाकांत काळे, साधना दातीर, नारायण पाटील या मुख्याध्यापकांनी मार्गदर्शन केले. या प्रशिणासाठी विद्यालयाचे प्राचार्य बाळाराम पाटील, पर्यवेक्षक अनिल करपे, प्रशिक्षण समन्वयक प्रदीप शिंदे आणि मधुकर क्षीरसागर, सुरेखा खैरनार यांनी विशेष परिश्रम घेतले.
ADDRESS
VS News, Khararwadi,
Pimpri-Chinchwad
CONTACTS
Email: vsnews24x7@gmail.com
Phone: +91 91724 53002