पद्यावती चित्रपटाविरोधात पिंपरी महापालिकेवर मोर्चा
व्हीएस न्यूज – संजय लीला भन्साळी दिग्दर्शित पद्मावती चित्रपटात पद्मिनी राणीचा अपमान केला असल्याचा आरोप करत या चित्रपटाच्या विरोधात पिंपरी चिंचवड राजपूत समाज संघटनेने आज (सोमवारी) महापालिकेवर मोर्चा काढला. यावेळी आंदोलकांनी संजय लीला भन्साळी यांच्या विरोधात तीव्र घोषणाबाजी केली. तसेच राजपुत समाज संघटनेच्या वतीने पालकमंत्री गिरीश बापट यांनी निवेदन देण्यात आले.
पिंपरी-चिंचवड राजपूत समाज संघटनेने हा महामोर्चा शहर प्रमुख नीता परदेशी यांच्या नेतृत्वाखाली काढण्यात आला. या मोर्चात राजपूत नागरिक सहभागी झाले होते. यावेळी नीता परदेशी म्हणाल्या की, राजपूत समाजात पद्मिनी हे देवीचे स्वरूप आहे. तिने आपली अब्रू वाचविण्यासाठी आपल्या 16 हजार दासी आणि राण्यांसोबत जोहर (सती) केला होता.
अशा राणीचा अपमान चित्रपटाच्या माध्यमातून करण्याचा लाजिरवाणा प्रयत्न संजय लीला भन्साळी यांनी केला आहे. दिंग्दर्शकाने केवळ टीआरपीसाठी इतिहासात हस्तक्षेप केला जात आहे. यापूर्वी देखील जोधा अकबर, बाजीराव मस्तानी अशा चित्रपटांच्या माध्यमातून इतिहासात हस्तक्षेप करण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. त्यामुळे हिंदू समाजाच्या भावना दुखावल्या गेल्या असून आम्ही पद्यावती चित्रपट प्रदर्शित होवू देणार नाही, असा इशाराही त्यांनी यावेळी दिला.
ADDRESS
VS News, Khararwadi,
Pimpri-Chinchwad
CONTACTS
Email: vsnews24x7@gmail.com
Phone: +91 91724 53002